अण्णाची तब्येत खालावली

आंदोलनाच्या सहाव्या दिवशी रक्तदाब आणि शुगर वाढली
नवी दिल्ली – लोकपालसह विविध मागण्यांसाठी रामलीला मैदानावर उपोषणावर बसलेले अण्णा हजारे यांची आज तब्येत बिघडली. डॉक्‍टरांनी मौन पाळण्याचा सल्ला दिल्यामुळे अण्णांना आपली नियमित पत्र परिषद रद्द करावी लागली.
अण्णा हजारे यांची आंदोलनाच्या सहाव्या दिवशी प्रकृती अचानक बिघडली. अण्णांचे साडे पाच किलो वजन घाटले असून रक्तदाब वाढला आहे. साखरेचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे डॉक्‍टरांनी अण्णांना विश्रांती आणि मौन पाळण्याचा सल्ला दिला आहे. याच कारणामुळे नियमित पत्र परिषद रद्द करावी लागली.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कारभारामुळे आम आदमी पक्ष सोडणारे योगेंद्र यादव यांनी आज रामलीला मैदानावर पोहचून आंदोलनाला पाठिंबा दिला.

ज्या दिवशी आमची सहनशक्ती संपेल त्या दिवशी संसदेला घेराव सुद्धा घालू, अशी धमकीवजा इशारा अण्णा हजारे यांनी नुकताच केंद्र सरकारला दिला होता. आम्ही जेलमध्ये जाऊ आणि तेथे आंदोलन करू. जेलमध्ये जाणे आमच्यासाठी मेडल मिळविण्यासारखे आहे, असेही ते म्हणाले होते.

महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत आल्याचे कल अण्णा टीमकडून सांगण्यात आले होते. परंतु, ते अद्याप अण्णांच्या भेटीला मैदानावर आले नाही.

आंदोलनाच्या पाचव्या दिवसपासून अण्णा बऱ्यापैकी थकल्यासारखे वाटत होते. अण्णा म्हणाले की, आमच्या मागाण्यांवरून पंतप्रधान कार्यालयात चर्चा सुरू आहे. आज किंवा उद्या सकाळी सरकारकडून लेखी प्रस्ताव येण्याची शक्‍यता आहे. प्रस्ताव समाधानकारक असला तर पुढचा निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा दिल्लीला येत आहेत.

दरम्यान, अण्णांनी दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकारचा समाचार घेतला. रामलीला मैदानावरील आंदोलनाचे सीसीटीव्ही फुटेज भाजपच्या मुख्यालयाला पाठविले जात आहे. ही लोकशाही आहे का? आणि आंदोलकाकडे पाकिस्तानच्या नागरिकप्रमाणे संशयित नजरेने पाहणे सरकारला शोभते काय? सरकारने असे करू नये, असे अण्णा म्हणाले.
केंद्र सरकारने 2013 मध्ये लोकपाल विधेयक पारित केले. पण कायदा कमजोर केला. पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, सचिव आणि खासदार यांच्या चौकशीचे अधिकार लोकपलला मिळायला पाहिजे. तसेच, मुख्यमंत्री, मंत्री आणि आमदार यांची चौकशी करण्याचे अधिकार लोकयुक्ताला मिळाले पाहिजे. यासाठी सध्याच्या कायद्यात सुधारणा करून नवीन कायदा आणला तरच आम्ही मान्य करू, असा इशारा सुद्धा अण्णांनी दिला.

मुखमंत्री अरविंद केजरीवाल, राज्यपाल किरन बेदी यांच्यासारखे आमच्यासोबत नाही हे आमच्यासाठी चांगले आहे, असे अण्णा एक प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)