अण्णांनी सरकारला ठणकावले

ठोस आश्वासनाशिवाय मागे हटणार नाही
नवी दिल्ली – केंद्र सरकार गिरीश महाजन यांना चर्चेसाठी पाठवित आहे. निव्वळ चर्चा करून काहीही उपयोग नाही. लोकपालसह सर्व मागण्यांची अंमलबजावणी सरकार किती दिवसात करणार? याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे अण्णा हजारे यांनी आज सरकारला ठणकावून सांगितले. मात्र, सरकारने समाधानकारक लेखी हमी दिल्यास उपोषण मागे घेण्याचा विचार केला जावू शकतो, असेही अण्णांनी आज स्पष्ट केले.

महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज अण्णांची भेट घेवून जवळपास अर्धा तास चर्चा केली. या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना अण्णा म्हणाले की, लोकसभेत विरोधी पक्षनेता नाही म्हणून लोकपालची नेमणूक करता आली नाही, असे सरकारकडून सांगितले जाते. मात्र, राज्यांत लोकायुक्तची नियुक्ती का केली नाही? राज्यांतही विरोधी पक्षनेतेपद रिक्त होते काय? मुळात, लोकपाल आणि लोकायुक्त कायद्यासह अन्य मागण्यांवर सरकार गंभीर असेल तर सरकारने सर्व मागण्यांची पुर्तता किती दिवसात होईल? याचा ठोस समाधानकारक कृती आराखडा सादर केला तर उपोषण मागे घेण्याचा विचार केला जाईल. अन्यथा, शरीरात प्राण असेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असे अण्णांनी स्पष्ट केले.

डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकयांना दीडपट हमी भाव मिळायला पाहिजे. यासाठी कृषी मूल्य आयोगाला स्वायत्तता मिळने गरजेचे आहे. आयोगाला घटनात्मक दर्जा आहे असे सरकारकडून सांगितले जात असले तरी ते कृषी मंत्रालयाच्या अखत्यारित आहे. कृषी खात्याच्या सावलीतून आयोगाला बाहेर काढले पाहिजे. याशिवाय सरकारने कृषी आयातनिर्यात धोरण आणि शेतकरीमजूर हित संरक्षण कायदा करायला पाहिजे. 60 वर्षांच्या वरील शेतकयांना पाच हजार रूपये पेंशन देण्यासही सरकार तयार आहे. परंतु आश्वासन मौखीक नको तर लेखी स्वरूपात हवे आहे. कृषी आयातनिर्यात धोरण शेतकरीभिमूख व्हायला पाहिजे, असे अण्णांनी स्पष्ट केले.

निवडणूक धोरणात बदल होणेही आवश्‍यक आहे. एखाद्या निवडणुकीत नाकारल्या गेलेल्या उमेदवारांना पुन्हा निवडणुकीत उभे राहता येणार नाही अशी कायद्यात तरतूद करावी अशीही अण्णांची मागणी आहे. रामलीला मैदानावरील आंदोलनात दिवसेंदिवस कमी होत चाललेल गर्दी दिल्लीत चर्चेचा विषय झाली आहे. आज चौथ्या दिवशी गर्दी कालपेक्षा कमी होती. रबी पीकांची कापणी आणि नवरात्र सुरू असल्यामुळे गर्दी कमी असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. शिवाय, शेजारच्या राज्यांतून येणायांना अडविले जात असल्यामुळेही गर्दी कमी असल्याचे सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)