अण्णांची प्रकृती खालावली ; कोअर कमिटीची तातडीची बैठक

नवी दिल्ली : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण सातव्या दिवशीही सुरुच आहे. मात्र अण्णांची प्रकृती खालावली असल्याने आंदोलकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान, अण्णांनी कोअर कमिटीची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढची रणनिती ठरवण्यात येईल.

सरकारचे आत्तापर्यंतचे प्रस्ताव, अण्णांची ढासळत चाललेली प्रकृती या दोन्ही पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा होईल. अण्णांच्या प्रकृतीबद्दल कालपासून आंदोलकांमध्ये चिंता आहे. जनलोकपाल, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचे बदल या मागण्यांसाठी अण्णांचं गेल्या सात दिवसांपासून रामलीलावर उपोषण सुरु आहे. 23 मार्चला म्हणजे शहीद दिनाच्या दिवशी अण्णांनी उपोषणाची सुरुवात केली होती. मात्र केंद्र सरकारकडून अद्याप आंदोलनाची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)