अणेची ग्रामसभा कोरमअभावी तहकूब

आणे-जुन्नर तालुक्‍यातील पठार भागावरील अणे गावचे सरपंच प्रकाश बोरा यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 31) भरवण्यात आलेली विशेष ग्रामसभा कोरमअभावी तहकूब करण्यात आली. दुष्काळी जनतेला दिलासा देण्यासाठी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी या सभेला परिसरातील शेतकऱ्यांना बोलावण्यात आले होते. यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने जनावरांना चारही राहिलेला नाही. या भागात विविध पक्षांच्या नेत्यांनी दुष्काळी दौरे केले; पण जनतेच्या हाती अजून काही आले नाही. पिण्याचे पाणी व जनावरांचा चारा हे विषय या ग्रामसभेत होणार होते.

  • सरपंच गावातील जनतेला वेळ देत नाहीत. ग्रामसभा तहकूब करण्याचा सरपंचांनी निर्णय घेतल्याने अनेक ग्रामस्थांनी निषेध केला. सरपंच मनमानी करतात. सर्वसामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागायचा?
    राजू आहेर, ग्रामपंचायत सदस्य, आणे
  • ग्रामस्थांची संख्या कमी असल्याने ही ग्रामसभा तहकूब करण्यात आली. मीही बराच वेळ ग्रामस्थ येण्याची वाट पाहिली.गुरुवारी (दि. 8) पुन्हा ग्रामसभा घेण्यात येणार आहे. मलाही जनतेची काळजी आहे. नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी विरोधक काहीही आरोप करत असतात.
    प्रकाश बोरा, सरपंच, आणे

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)