अडुळपेठ येथे इनोव्हा कारने चौघांना उडवले : एक ठार

पाटण, दि. 6 (प्रतिनिधी) – कराड-चिपळूण मार्गावर अडुळपेठ, ता. पाटण येथे वाढदिवसाचा फ्लेक्‍स लावत असताना अचानक भरधाव वेगाने आलेल्या इनोव्हा कारने चौघांना धडक देवून उडवले. या अपघातात एक 18 वर्षीय युवक ठार झाला असून अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, ही घटना संशयास्पद असून घातपात असण्याचा आरोप या घटनेत मयत व जखमी झालेल्या युवकांच्या पालकांनी व ग्रामस्थांनी केला आहे. जोपर्यंत संशयित आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यत मयत युवकांचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने शनिवारी दुपारपर्यंत वातावरण तणावपूर्ण बनले होते.
अडूळ पेठ गावांतील एकाचा वाढदिवस असल्याने गावातील काही तरुण एकत्र येऊन कराड-चिपळूण रस्त्याशेजारी वाढदिवसाचा फ्लेक्‍स शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास उभा करीत होते. त्यावेळी नवारस्ताहून अडुळच्या दिशेने येणाऱ्या इनोव्हा गाडीने रस्त्या शेजारील युवकांना उडवून इनोव्हा कार पाटणच्या दिशेने निघून गेली. या घटनेत साहिल दिनकर निवडुंगे (वय 19), महेश दत्तात्रय शिर्के (वय 19), रविंद्र शिवाजी नलवडे (वय 20), गणेश रामचंद्र शिर्के (वय 18) सर्व रा. आडुळ पेठ हे गंभीर जखमी झाले. तर तुषार दत्तात्रय चौधरी (वय 18) हा किरकोळ जखमी झाला. चार गंभीर जखमींना तातडीने कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता अधिक रक्तस्त्राव झाल्याने साहिल दिनकर निवडुंगे या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या अपघाताची नोंद पाटण पोलीस ठाण्यात झाली असून पोलिसांनी इनोव्हा गाडी क्र. 01 एई 1187 आणि गाडीचा चालक अक्षय विकास डिगे रा. आडुळ याला ताब्यात घेतला आहे.
दरम्यान, ही घटना संशयास्पद असून जोपर्यंत या घटनेतील आणखी संशयितांचा शोध घेऊन त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जात नाही. तोपर्यत मयत साहिल निवडुंगे याचा मृत्यूदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने तब्बल तीन तास संशयित आरोपीच्या दारातच साहिलचा मृतदेह ठेवण्यात आला होता. त्यामुळे अडूळ पेठमध्ये शनिवारी सकाळपासून तणावपूर्ण वातावरण होते.अखेर पाटण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यु. व्ही. भापकर, पोलीस उपनिरीक्षक डी. आर. अतिग्रे, पोलीस उपनिरीक्षक अमृता रजपूत यांनी ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन संशयितावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्याने नातेवाईकांनी साहिलचा मृतदेह ताब्यात घेतला. आणि उशिरा कोयना नदीकाठी भावपूर्ण वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे अडुळ गावावर शोककळा पसरली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)