पुणे: अडीच कोटी रुपयांचा अपहार; महाबॅंक व्यवस्थापकावर गुन्हा

पुणे – अडीच कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बॅंक ऑफ महाराष्ट्रचे निलंबित शाखा व्यवस्थापक मुकुंद सोळेगावकर यांच्यासह दोघाजणांविरूद्ध केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.

सोळेगावकर (रा. सत्यश्री अपार्टमेंट, आनंदनगर, सिंहगड रस्ता) यांच्यासह राकेश जाधव आणि अन्य एका अज्ञात आरोपीविरुद्ध अपहार केल्याप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोळेगावकर हे 2009 ते 2017 या कालवधीत बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या सहकारनगर, मुळशी तालुक्‍यातील लवळे, लासुर्णे, हडपसर तसेच तळेगांव दाभाडे शाखेत व्यवस्थापक होते. या कालावधीत सोळेगावकर यांनी 2 कोटी 56 लाख 15 हजार 998 रुपयांचा अपहार केला. सोळेगावकर यांनी जाधव यांच्याशी संगनमत केले. जाधव आणि एका आरोपीच्या खात्यात ही रक्कम वळविण्यात आली, असे सीबीआयकडून दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सोळेगांवकर यांनी बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या हडपसर शाखेत 2 कोटी 8 लाख 32 हजार 615 रुपयांचा, तसेच सहकारनगर शाखा, लवळे, लासुर्णे आणि तळेगाव दाभाडे शाखेत अपहार केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक शीतल शेंडगे याप्रकरणाचा तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)