अडीच एकरी जागा परत देण्यास रिपाइंचा विरोध

संग्रहित छायाचित्र

पुणे – सिंहगड रस्त्यावरील अडीच एकर जागा मूळ मालकाला देण्याचा सोमवारी मुख्यसभेने एकमताने मंजूर केलेला प्रस्ताव विखंडीत करावा अशी मागणी रिपाइंने केली आहे. तसे पत्र रिपाइंने महापालिका आयुक्तांना दिले आहे. तसे न केल्यास आरपीआयच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
आरपीआय शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, डॉ. धेंडे, बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर आणि आरपीआय नगरसेवकांसह अन्य नऊ जणांनी या निवेदनावर स्वाक्षरी केली आहे.

ही जागा नियमावलीप्रमाणे वाटप करण्यात आली आहे. हा निर्णय महापालिकेचे आर्थिक नुकसान करणारा आणि न्यायालयाचा अवमान करणारा आहे. सार्वजनिक हिताच्या विरोधी कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार महापालिकेच्या मुख्यसभेला नाही, असे या पत्रात म्हटले आहे. मुख्यसभेने केलेला हा ठराव विखंडीत करून तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवावा. तसे न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)