अडीचशे वर्षापूर्वीच्या मूर्तीची चोरी

श्रीगोंद्यात जैन मंदिरातील घटनेने संताप
श्रीगोंदा-शहराच्या मध्यवस्तीतील दिगंबर जैन मंदिरातील अडीचशे वर्षापूर्वीची तीन किलो वजनाची आणि सुमारे दोन लाख रुपये किमतीची 24 तीर्थनकर यांची पुरातन पंच धातूची मूर्ती चोरीला गेली. शनिवारी (दि.12) सकाळी ही घटना घडली. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अधिक माहिती अशी ः शहरातील मुख्य रस्त्यावर पुरातन दिगंबर जैन मंदिर आहे. मंदिरात अडीचशे वर्षापूर्वीची चोवीस तीर्थनकर यांची पंचधातूची व इतर अकरा मूर्ती होत्या. शनिवारी सकाळी 9 ते 9.30 वाजनेच्या सुमारास संतोष सोनी व डॉ. प्रवीण बडजाते यांनी मंदिरात जाऊन पूजा केली त्यावेळी सर्व मूर्ती होत्या. त्यानंतर दहा वाजता बडजाते या महिला भक्त मंदिरात गेल्या असता त्यांना चोवीस तीर्थनकर यांची दीड फूट उंचीची पंचधातूची मूर्ती नसल्याचे लक्षात आले.
क्षणार्धात ही वार्ता जैन बांधवात पसरली. बाजूला असलेल्या डॉ. भापकर हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सकाळी दहा वाजता हातात एक पिशवी घेऊन बाहेर पडलेली व्यक्ती दिसून आली. मात्र दूर अंतरामुळे कॅमेऱ्यात सदर व्यक्ती अस्पष्ट दिसत असल्यामुळे नेमकी व्यक्ती कोण याचा बोध होत नाही. मूर्तीची चोरी होण्याच्या आदल्या दिवशी पलिवार यांच्या कापड दुकानातील गल्ल्‌यातून सुमारे आठ हजार रुपयाची चोरी झाली होती.

सोनी यांनी सुमारे दोन लाख रुपये किंमतीची जैन मूर्तीची चोरी झाल्याची फिर्याद दाखल केल्यानंतर अज्ञात चोराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)