अडचणीत आलेल्या जहाजातील 343 जणांची मदत

नवी दिल्ली – पूरामुळे समुद्रात अडचणीत आलेल्या जहाजावरील 343 प्रवाशांना भारतीय तटरक्षक दलामे सुखरुप सोडवले. “एम व्ही स्वराज द्वीप’ हे प्रवासी जहाज कर निकोबार बेटावरून निघाले होते.

किनाऱ्यापासून 40 सागरी मैल इतक्‍या अंतरावर असताना पूरामुळे ते हेलकावे खावू लागले. जहाजावर पाणी घुसायला लागल्यामुळे केलेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन तटरक्षक दलाने हे जहाज दुसरीकडे वळवले आणि डॉनिअर विमानाच्या सहाय्याने जहाजावरील प्रवाशांना सुखरूप हलवाले. जहाजावरील पाणी मोठे पंप लावून उपसण्यात आले. त्यानंतर जहाजावरील सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे तटरक्षक दलाने स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)