“अडचणीच्या काळात सर्वसामान्यांना मदतीचा हात’

राजगुरूनगर- अडचणीच्या काळात सर्वसामान्य माणसाला मदत करण्याचे काम हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून तालुक्‍यात केले जात आहे, असे प्रतिपान फाउंडेशनचे अध्यक्ष ऍड. सुनील वाळूंज यांनी केले. कोहिनकरवाडी (ता. खेड) येथील रोहिदास भिवा कोहिनकर या गरीब कुटुंबाच्या आजारपणात मदतीचा हात देणात आला. कोहिनकर यांना महिनाभरापूर्वी पॅरालीसीसचा ऍटक आला होता. त्यामुळे या कुटुंबाची मोठी वाताहत झाली. या कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न येथील हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या कुटुंबाला किराणा आणि शाळापयोगी साहित्य देण्यात आले. याबरोबरच गावातील इतर गरीब कुटुंबातील व्यक्‍तींना ब्लॅक्‍टचे वाटप नुकतेच करण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष ऍड. सुनील वाळूंज, सरपंच वैशाली कोहिनकर, उपसरपंच संदीप उबाळे, ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ कोहिनकर, मनीषा कोहिनकर, मनीषा मुळे, रेश्‍मा मुळे, ग्रामसेवक किशोर रायसिंगवाकडे, फाउंडेशनचे संचालक दिलीप होले, राजन जांभळे, राहुल वाळुंज, उत्तम राक्षे, महिंद्र वाळूज, हेमंत वीरकर, आकाश बोंबले, रंगनाथ कुटे, संजय घुमटकर, संतोष सांडभोर, कैलास दुधाळे, मनीषा गारगोटे, राजश्री गुंडाळ, संगीता तनपुरे, नाजनीज शेख, अर्चना गारगोटे, छाया दुधाळे उपस्थित होते. सुनील वाळूंज म्हणाले की, दोन गटातील वाद सोडविण्यासाठी आणि गावातील वंचित गरीब घटकाला मदत करण्याचा प्रयत्न यापुढील काळातही केला जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)