अडगळीतील बंद हातपंप सुरू होणार

शिक्रापूर परिसरात जिल्हा परिषद सदस्यांचा उपक्रम

शिक्रापूर- उन्हाळा सुरु झाल्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याची समस्या भेडसावत आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथे देखील पाण्याची समस्या निर्माण होऊ लागली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषद गटातील हातपंपांची दुरुस्ती सुरू केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नागरिकांना पाण्याच्या समस्येवर मात करण्याची वेळ येणार नाही.
शिक्रापूर येथे तळेगाव रोडलगत असलेल्या एसटी स्थानकाजवळील जुन्या काळातील हातपंप अनेक दिवसांपासून अडगळीत पडले आहेत. हातपंपामधील पाईप व नळ्या गंजल्या आहेत. त्यामुळे नादुरुस्त हातपंप अडगळीत पडले होते. याकडे कोणाचेही लक्ष नव्हते. हे दुर्लक्षित हातपंप व आतील पाईप गंजल्यामुळे हातपंपातून गढूळ पाणी येत होते. त्यामुळे नागरिकांना या हातपंपाचे पाणी पिणे अशक्‍य झाले होते. या पाण्याचा धोका आरोग्यावर होणार होता. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या कुसुम मांढरे यांनी पुढाकार घेत जिल्हा परिषदेच्या वतीने या हातपंपाची दुरुस्ती करून घेण्याबाबत जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे पाठपुरावा केला. त्यांनतर जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी लालासाहेब पवार, दत्तात्रय लांडगे, शेखर पवार, संजय धुळे यांनी शिक्रापूर येथील हातपंपाची दुरुस्ती करीत संपूर्ण हातपंप नव्याने उभारला आहे. त्यामुळे येथील हातपंपातून आता नागरिकांना स्वच्छ पाणी मिळणार आहे. यामुळे नागरिकांना पुढील काळामध्ये पाण्याच्या समस्येला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही. तर शिक्रापूर परिसरातील कोणत्याही गावात पिण्याच्या पाण्याची समस्या तसेच हातपंप बंद असतील तर नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे संपर्क साधण्याचे आवाहन उपसरपंच आबाराजे मांढरे व जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांनी सांगितले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)