अडकलेल्या बिबट्याची सुटका हे मोठे आव्हान

संग्रहित छायाचित्र...

डॉ. अजय देशमुख : गर्दी, गोंधळ, गोंगाटामुळे परिस्थिती अडचणीची

पुणे – आपत्कालीन परिस्थितीत बिबट्या अथवा इतर वन्यप्राण्याची सुटका (रेस्क्‍यु) करणे हे दिवसेंदिवस आव्हानात्मक होत आहे. विशेषत: नागरी परिसरात होणाऱ्या हस्तक्षेपामुळे रेस्क्‍यू परिस्थिती ही “रेस्क्‍यू टीम’साठी आव्हानात्मक व बिबट्यासाठी जीवघेणी असते, अशी माहिती माणिकडोह बिबट्या निवारा केंद्र येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख यांनी दिली.

विहिरीत पडलेल्या, घरात अडकलेल्या बिबट्याची चित्रफीत सोशल मीडियावर सातत्याने “व्हायरल’ होते. याच पार्श्‍वभूमीवर डॉ. देशमुख यांनी बिबट्याच्या “रेस्क्‍यू’बाबत माहिती दिली. ते म्हणाले, “एखाद्या ठिकाणी फसलेल्या बिबट्याला वाचविणे फार अवघड काम नसते. परंतु लोकांची गर्दी, गोंधळ, गोंगाट यामुळे परिस्थिती गंभीर होते. बिबट्या पाहण्याचे आकर्षण सर्वांनाच असते, यामुळे बचावकार्यात अडथळा येतो. अशा परिस्थितीत बचाव पथक तणावाखाली असते. या पथकाला बिबट्याची सुटका, गर्दी बाजूला करायची, बिबट्या कोणत्या स्थितीत आहे हे ओळखून निर्णय घायचे असतात. जर त्याला बेशुद्ध करायचे असेल, तर अजून मोठा ताण असतो. बिबट्या बघून त्यानुसार बेशुद्ध औषधीचे नियोजन करायचे असते. बिबट्याला बेशुद्ध करतांना त्याच्या लिव्हर किंवा किडनीची स्थिती माहिती नसते. मनुष्याला भूल देण्यापूर्वी लिव्हर, किडनी ठीक आहे का हे बघितले जाते. त्यामुळे बचाव पथकाच्या पशुवैद्यकासमोर ते मोठे आव्हान असते. बिबट्याची सुटका करतांना बरे-वाईट झाल्यास पशुवैद्यक अधिकाऱ्यास जबाबदार धरले जाते. त्याने औषध जास्त दिले असेल, हा सूर सहसा ऐकण्यास मिळतो. त्यामुळे अशी “रेस्क्‍यू’ स्थिती हाताळण्यास बरेच लोक तयार होत नाहीत.’

“रेस्क्‍यू’ परिस्थिती हाताळणे हे फक्त पथक किंवा वनविभागाचे काम नाही, तर ती सर्वांची जबाबदारी आहे. एक प्राणी अडकलेला आहे व त्याची सुटका किती गरजेची आहे, याची जाणीव सर्वांना असायला हवी,’ असेही देशमुख यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)