अठराव्या मजल्यावरून पडूनही जिवंत!

संग्रहित छायाचित्र

वाचकहो, ‘शोले’ चित्रपटातील धर्मेंद्रवर चित्रीत करण्यात आलेला पाण्याच्या टाकीवरचा सीन तुम्हाला आठवत असेल ना ? “मौसी ये जो बसंती है ना….’ हे डायलॉगही अनेकांना पाठ असतील. बसंतीशी विवाह न झाल्यास मी आत्महत्या करेन असे म्हणत हेलकावे खाणाऱ्या धर्मेंद्रचा हा सीन बराच गाजला. वास्तवातही अनेक जण अशा प्रकारे आत्महत्येचा प्रयत्न करतात, तर काही जण आत्महत्याही करतात.

मात्र काहींच्या बाबतीत गमतीशीर किंवा चमत्कारिक घटनाही घडते. अशीच एक घटना चीनमध्ये घडली. चीनमध्ये शेनडोंग प्रांतात एका महिलेने आत्महत्या करण्यासाठी इमारतीच्या अठराव्या मजल्यावरून उडी ठोकली. मात्र, तरीही तिला वाचवण्यात लोकांना यश आले. ही महिला उडी ठोकण्यासाठी अठराव्या मजल्याच्या छपरावर उभी होती. त्यावेळी तिला वाचवण्याची तयारी करण्यात आली होती. या महिलेला अशा ठिकाणी उभे राहिलेले पाहून काहींनी तत्काळ पोलिसांना पाचारण केले.

-Ads-

पोलिसांनी तिच्याशी संपर्क साधून असे टोकाचे पाऊल न उचलण्याविषयी विनवले. मात्र, ती त्यांच्या आवाहनाला दाद देत नव्हती. ते पाहून या काळातच पोलिसांनी जमिनीवर अनेक गाद्या पसरून ठेवल्या. या महिलेने उडी मारल्यावर ती जमिनीवरील जाडजूड गाद्यांवर येऊन पडली. किरकोळ दुखापतींशिवाय तिला काहीही झाले नाही. तिला तत्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून तिची प्रकृती बरी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)