अट्टल दुचाकी चोर अखेर गजाआड

पिंपरी – शाळा महाविद्यालयांच्या पार्किंग परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या एका अट्टल दुचाकी चोराला भोसरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 33 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे, या सर्व दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवड पसिरातील 13 पोलीस ठाण्यात 33 गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी त्याच्याकडून 16 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. सुभाष आसाराम तौर (वय-25, रा. माऊली कृपा निवास, गो शाळेच्या मागे, वडगाव रोड, आळंदी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

-Ads-

सहायक पोलीस आयुक्‍त सतीश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या चोराने बी. कॉमचे शिक्षण घेतले आहे. हा चोर महाविद्यालयाच्या पार्किंगमधून चोरी करीत होता. चोरी केलेल्या दुचाकी मित्रांच्या मदतीने किरकोळ किमतीला विकत असे. भोसरी पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार भोसरी परिसरात सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडून आणखी दुचाकी मिळण्याची शक्‍यता आहे. त्याने दुचाकी विकलेल्यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)