अट्टल घरफोड्याला एलसीबीने केला जेरबंद


सातारा,दि.7 (प्रतिनिधी)


सातारा व कोरेगाव तालुक्यात घरफोड्या करणार्‍या अट्टल घरफोड्याला पोलिसांनी जेरबंद केले.  ही कारवाई    सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास जाधव  यांनी केल ी.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातारा शहरासह तालुक्यात वाढलेले घरफोड्यांचे सत्र थांबत नसल्याने जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले होते.

त्यानुसार एलसीबीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास जाधव चोरट्याच्या मागावर होते. रविवार दि. 6 रोजी विकास जाधव सातारा शहरात पेट्रोलिंग करत असताना, देगाव फाटा येथे एक युवक चोरीच्या साड्या विकत असल्याची माहिती त्यांना मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार जाधव यांनी तात्काळ देगाव फाटा येथे धाव घेतली. त्यावेळी एक युवक संशयास्पद हालचाली करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याला ताब्यात घेत, चौकशी  केल ी.

तेव्हा त्याने शेंद्रे,पाटखळमाथा,सातारा शहर, कोरेगाव तालुक्यात कपड्याच्या दुकानात व दुचाकी चोरल्याची कबुली दिली .त्याने आत्तापर्यंत पंधरा गुन्ह्यांची कबुली दिली .


ही कारवाई जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांच्या सुचनेनुसार एलसीबीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास जाधव, सहाय्यक फौजदार मोहन घोरपडे, हवालदार उत्तम दबडे, तानाजी माने,चंद्रकांत भोईटे,संतोष पवार, विजय कांबळे,नितीन गोगावले,शरद बेबले, मुबीन मुलाणी, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, निलेश काटकर, विक्रम पिसाळ, मयुर देशमुख, संजय जाधव, विजय सावंत यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)