अटी पाळा, नाहीतर करार रद्द करू

मद्यधुंद अवस्थेत बस चालविल्याचे प्रकरण भोवणार


ठेकेदाराला पीएमपीची नोटीस : सुरक्षेच्या मुद्यांवर भर

पुणे – गेल्या महिनाभरात महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह या ठेकेदाराच्या सुरक्षेच्या दृष्टीने घातक अशा तीन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. यामुळे पीमपीने या ठेकेदाराला नोटीस दिली आहे. करारावेळी घालून दिलेल्या अटी व शर्थींचे पालन करावे, अन्यथा करार रद्द करण्याचा इशारा यात देण्यात आला आहे.

कात्रज-कोथरुडदरम्यान मद्यधुंद अवस्थेत बस भरधाव चालवणाऱ्याला प्रवाशांनी रोखले. यात संभाव्य दुर्घटना टळली. ही बस ही महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह या ठेकेदाराची असून ड्रायव्हरही खासगीच आहे. या प्रकरणी संबंधित कंपनीला पीएमपी प्रशासनाने नोटीस बजावली आहे. ही घटना रविवारी घडली होती. तर, पंधरा दिवसांपूर्वी भुसारी कॉलनीत चढावरुन बस घसरल्याने दोन दुचाकींचा चुरा झाला होता. तसेच, त्यापूर्वी कोथरुड डेपोसमोर आग लागलेली बसही याच ठेकेदाराची आहे. यामुळे महिन्यातच तीन घटना घडल्या आहेत. यामुळे सदर ठेकेदाराला नोटीस देत सेवेत सुधारणा करण्याचे सांगण्यात आले आहे. यानंतरही सुधारणा न झाल्यास करार रद्द केला जाऊ शकतो, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

काय म्हटले आहे नोटिशीत?
– ब्रेकडाऊनचे प्रमाण जास्त असून नियोजन करावे
– चालक वारंवार बदलले जात आहेत.
– महिन्यात तीन दुर्घटना घडल्याने सुरक्षेचा प्रश्‍न
– करारामध्ये घालून दिलेल्या नियमांचे सातत्याने उल्लंघन


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)