अटल विश्वकर्मा सन्मान योजना नाव नोंदणी सुरू

खटाव ः अटल विश्वकर्मा सन्मान योजनेमध्ये सुरू असलेली नाव नोंदणी.

खटाव, दि. 28 (प्रतिनिधी)- कामगारांच्या कल्याणासाठी व सन्मानासाठी महाराष्ट्र शासनाने कामगार विभागाच्या माध्यमातून, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळ यांच्या वतीने “अटल विश्वकर्मा सन्मान योजना’सुरू करण्यात आली आहे.मंडळाच्यातर्फे बांधकाम कामगारांसाठी 28 विविध कल्याणकारी योजना राबवील्या जातात. योजनांचा लाभ घेण्यासाठी वय वर्ष 18ते60 असून कामगार मंडळाकडे नोंदणी आवश्‍यक आहे.कामगारांच्या नावनोंदणीसाठी साताऱ्यासह सतरा जिल्ह्यांमध्ये दि.19 नोव्हेंबर ते19 डिसेंबर2018 या कालावधीत ‘विशेष नोंदणी अभियान’ राबवीले जात आहे.माजी जिल्हा परिषद सदस्य, महेश शिंदे व जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ,राहुल पाटील यांच्या सहकार्यातून खटावमध्य ही मोहीम राबवीली गेली.खटाव मधील कामगार नोंदणीची संख्या जवळ-जवळ70ते80च्या आसपास गेली आहे. अशी माहिती सातारचे सहायक कामगार अधिकारी राजेंद्र दळवी यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)