अटल बिहारी वाजपेयी यांचे पार्थिव स्मृतिस्थळी दाखल 

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे पार्थिव स्मृतिस्थळी दाखल झाले आहे. अंत्ययात्रेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित हजारोंच्या संख्येने समर्थक उपस्थित आहेत.

हजारोंच्या संख्येने समर्थक उपस्थित असल्याने येथे सुरक्षेचा मोठा बंदोबस्त केला आहे. अटलजींच्या अंत्ययात्रेत  तरुणाचा सहभाग जास्त आहे. त्यांच्या पार्थिवापर्यंत पोहचण्याचे, त्यांचे दर्शन घेण्याचा अनेकजण प्रयत्न करत आहेत.

-Ads-

दरम्यान, देशातील सर्व दिग्गज नेते अटलजींचे अंतिम दर्शन घेण्यासाठी दिल्लीला दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अटल बिहारी वाजपेयींच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली असून त्यांच्या अंत्ययात्रेतही सहभागी झाले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)