अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती गंभीर

नवी दिल्ली –  भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती गंभीर असून त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. मागच्या दोन महिन्यांपासून ते एम्स रुग्णालयात उपचार घेत होते.

किडनी संसर्गामुळे अटल बिहारी वाजपेयी यांना ११ जून रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी रात्री एम्सने जारी केलेल्या बुलेटीननुसार, वाजपेयींची प्रकृती मागील २४ तासात चिंताजनक असून व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहेत. थोड्याच वेळात आणखी एक बुलेटीन जारी करण्यात येणार आहे.

-Ads-

याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांची रुग्णालयात भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. तसेच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, स्मृती इराणी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांंसह अनेक बड्या नेत्यांनी वाजपेयी यांची भेट घेतली आहे.

दरम्यान, २००९ पासून अंथरुणाला खिळून असलेले अटल बिहारी वाजपेयी हे डिमेंशिया (स्मृतिभ्रंश) आजाराने त्रस्त आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)