भारत-पाक शांततेसाठी अटलजींचे विशेष प्रयत्न – इम्रान खान

नवी दिल्ली – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इमरान खान यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अटल बिहारी वाजपेयी यांनी नेहमीच भारत-पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना नेहमीच लक्षात ठेवले जाईल, असे इमरान खान यावेळी म्हणाले आहेत.

इमरान खान म्हणाले की, वाजपेयी एक असे पंतप्रधान होते. ज्यांनी शेजारील देशांसोबत संबंध सुधारण्याच्या दिशेने पावले उचलली आणि पंतप्रधान झाल्यावरही त्या दिशेने वाटचाल सुरूच ठेवली. त्यांचे हे प्रयत्न नेहमीच लक्षात ठेवले जातील. त्यांच्या जाण्याने राजकीय जगतात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते पुढे म्हणाले, या दुःखाच्या वेळी माझी सहानुभूती भारतीयांसोबत आहे. दोन्ही देशामध्ये शांतता प्रस्थपित करून त्यांना आपण श्रद्धांजली देऊ, असेही ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)