अटल बिहारी वाजपेयींच्या स्मरणार्थ पंतप्रधानांनी जारी केले १०० रुपयांचे नाणे 

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ १०० रुपयांचे नाणे जारी केले आहे. या नाण्यावर अटल बिहारी वाजपेयी यांचे छायाचित्र आहे. २५ डिसेंबर रोजी वाजपेयी यांची ९५ वी जयंती आहे. संसदेच्या अॅनेक्सी सभागृहात आयोजित कार्यक्रमात लालकृष्ण अडवाणी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची उपस्थिती होते.

१०० रुपयाच्या नाण्याचे वैशिष्ट्य 
– नाण्याच्या एका बाजूला अटल बिहारी वाजपेयी यांचे छायाचित्र असून त्यांचे नाव देवनागरी आणि इंग्रजीमध्ये लिहण्यात आले आहे.
– तर दुसऱ्या बाजूला अशोक स्तंभ आहे.
– वाजपेयी यांच्या छयाचित्राखाली त्यांचे जन्मवर्ष आणि मृत्यूवर्ष लिहले आहे.
– नाण्याचे वजन ३५ ग्राम असून यामध्ये ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे, ५ टक्के निकेल आणि ५ टक्के जस्त आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)