अटल बिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनक; भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक रद्द

नवी दिल्ली – माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना एम्स रुग्णालयात फुल लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती पाहता अटल बिहारी वाजपेयी यांच्या नातेवाईकांनाही ग्वाल्हेरवरून दिल्लीला आणण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपने आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. शिवाय १८-१९ ऑगस्ट रोजी होणारी भाजपची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठकही रद्द करण्यात आली आहे. या बैठकीसाठी भाजप मुख्यालयाला फुलांची सजावट करण्यात आली होती. तीही काढून टाकण्यात आली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा पुन्हा एम्स रुग्णालयात पोहचले आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांना भेटण्यास अनेक बडे नेते रुग्णालयात येत असल्या कारणाने एम्स रूग्णालयाजवळील कृष्णा मेनन रस्त्यावरील सर्व छोटी दुकाने हटविण्यात आली आहे. तसेच तेथील सुरक्षा व्यवस्थाही वाढविण्यात आली आहे. या रस्त्यावर दिल्ली पोलिसांसह सीआरपीएफ जवानही तैनात करण्यात आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)