अटलबिहारी वाजपेयींनी देशाच्या विकासाचा ध्यास बाळगला : विधीमंडळाची वाजपेयींना आदरांजली 

मुंबई: भारताचे माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी हे राजकीय साधनसूचिता बाळगणारे नेते होते. त्यांनी कायमच देशाच्या विकासाचा ध्यास बाळगला. विविध प्रकारच्या विचारधारांचे कायमच स्वागत करत त्यांनी लोकशाहीला एक प्रकारची उंची गाठून देण्याचे काम केले. त्यामुळे अटलजींना आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली,अशा शब्दात आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात वाजपेयींना आदरांजली वाहण्यात आली.

‘अटल’सूर्याच्या तेजाची ओळख सांगणाऱ्या काजव्यांची गरज’ – मुंडे 
देशाच्या राजकीय, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात आज अंधाराचं, भीतीचं वातावरण आहे. देशवासियांच्या मनात एकाधिकारशाही, हुकुमशाहीची भीती दाटून आली असताना ‘अटल’सूर्याच्या तेजाची ओळख समाजाला करुन देण्यासाठी माझ्यासारख्या असंख्य काजव्यांची आज गरज आहे, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. अटलजींच्या एका सभेचे मी सूत्रसंचालन केले. सभेनंतर अटलजींनी मला जवळ बोलावून माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. प्रभू रामचंद्रांनी खारीच्या पाठीवर मारलेल्या शाबासकीची अनुभूती मी त्यादिवशी घेतली व ती थाप आजही मी अभिमानाने, आनंदाने मिरवतोय…’ असे मुंडे म्हणाले. 

वाजपेयी, माजी मंत्री आनंदराव नारायण देवकाते, माजी राज्यमंत्री वसंतराव रामराव धोत्रे, विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा विधानसभा सदस्य कॉम्रेड माधवराव बयाजी गायकवाड तसेच विधानसभा सदस्य केशवराव आत्माराम पारधी, वासुदेव आनंदराव देशमुख, शिवाजीराव नारायणराव नागवडे, वैजनाथराव यादवराव आकात, यादवराव कृष्णराव भोयर, लक्ष्मणराव विठोबा जाधव, वसंतराव विठोबा थोरात, विठ्ठलराव सहादू भैलुमे, वसंतराव बालाजीपंत इटकेलवार आणि विमल खंडेराव रांगणेकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत शोक प्रस्ताव मांडला.

“छोटे मन से कोई बडा नही होता और टूटे मन से कोई खडा नही होता,’ “गीत नया गाता हूँ,’ “मौत से ठण गई, जूँजने का मेरा इरादा न था’ या अटलजींच्या कवितांच्या ओळींचे वाचन करून मुख्यमंत्री म्हणाले, अर्थकारण, परराष्ट्र धोरण, शेती, समाजकारण, राजकारण, संरक्षण, धर्म, अध्यात्म आदी विविध क्षेत्रात अटलजींनी मांडलेले विचार पथदर्शी व कालातीत ठरले असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, संवेदनशील हृदयाचे अटलजी प्रसंगी देशहितासाठी कठोर झाल्याचेही दिसून आले. साहित्य, काव्य आदी क्षेत्रातही त्यांनी भव्य कामगिरी केली. 1996 साली विश्वासदर्शक ठरावावर बोलताना त्यांनी मांडलेला “सरकारें आयेंगी, सरकारें जायेंगी, पार्टियां बनेंगी, बिगड़ेंगी, लेकिन देश का लोकतंत्र जिंदा रहना चाहिए. भारत का लोकतंत्र अमर रहना चाहिए’ हे त्यांचे मत विचारांची उंची दर्शविते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)