अटलजीं पंतप्रधान बनण्याची पंडित नेहरूंची भविष्यवाणी ठरली खरी

नवी दिल्ली – अटल बिहारी वाजपेयी भविष्यात भारताचे पंतप्रधान बनतील अशी भविष्यवाणी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1957 साली केली होती. 1957 साली अटल बिहारी वाजपेयी लोकसभेची निवडणूक मथुरेत हारले होते, पण बळिरामपूरमधून विजयी झाले होते.

अटलजींचे लोकसभेतील पहिले भाषण ऐकल्यानंतर पंडित नेहरूंनी भविष्यवाणी केली होती, ही अटल बिहारी वाजपेयी एक दिवस भारताचे पंतप्रधान बनतील. पंडितजींचे द्रष्टेपण खरे ठरले. सन 1996 साली अल्पकाळाकरता आणि नंतर 1998 साली अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान बनले.

सारा देश ते बरे व्हावेत अशी प्रार्थना करत असताना गुरुवारी 16 ऑगष्ट रोजी संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी अटलजी हे जग सोडून गेले. सारा देश देश शोकाकूल झाला. पक्षामध्ये आणि विरोधकांमध्येही अटलजी प्रिय होते.

अटलजींचे वक्तृत्त्व अमोघ होते. प्रभावी होते. तामिळ नेते अन्ना दुराई हे अटलजींचे भाषण ऐकण्यासाठी अगत्यपूर्वक लोकसभेत येत असत,. एक्‍दा तर ते अटलजींचे भाषण ऐकण्यासाठी नॉर्थ ऍव्हेन्यूपासून चालत लोकसभेत आले होते. अटलजी पंतप्रधान असतानाचे त्यांचे मीडिया ऍडव्हायजर अशोक टंडन यांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)