नवी दिल्ली – माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे ९३ व्या वर्षी निधन झाले. अटलजींचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी भाजपा मुख्यालयात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी देशभरातील अनेक बड्या नेत्यांसह आंतराष्ट्रीय नेत्यांनीही उपस्थिती लावली आहे.

भूतानचे राजा जिग्मे खेसर नामगेयाल वांगचुक हे दिल्लीला पोहचले असून अटलजींना श्रद्धांजली वाहिली आहे. पाकिस्तानकडून अली जाफर, नेपाळचे परराष्ट्र मंत्री पीके ग्यावल, श्रीलंकेचे कार्यकरी परराष्ट्रमंत्री लक्ष्मण किरिएला, बांग्लादेशचे परराष्ट्रमंत्री अब्दुल हसन मोहम्मद अली, ब्रिटनचे उच्चायुक्त डॉमिनिक असक्विथ आदि नेते अटलजींच्या अंत्ययात्रेत सामील झाले आहेत.

यावेळी बांग्लादेशाच्या अब्दुल हसन मोहम्मद अली म्हणाले की, आम्ही अटलजींची आठवण बांग्लादेशाच्या स्वातंत्र्यांमधील योगदानासाठी आणि नागरिकांच्या मिळालेल्या समर्थनासाठी काढतो. त्यांना बंगाली संगीत खूप आवडत होते. जेव्हा ते परराष्ट्र मंत्री बनले तेव्हा मला दिल्लीमध्ये राजनायिक म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली.

ब्रिटेन उच्चायुक्त डॉमिनिक असक्विथ म्हणाले की, अटल बिहारी वाजपेयी एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व होते. त्यांच्यासाठी आमच्या मनात मोठा आदर आणि सम्मान आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)