नवी दिल्ली – माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी निधन झाले. अटलजींचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी भाजपा मुख्यालयात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी भाजप मुख्यालयात अनेक बड्या नेते हजेरी लावत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, भाजप ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गृहमंत्री राजनाथ सिंह डीएमके नेते ए राजा, आसामचे मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल यांनी अटल बिहारी वाजपेयींच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आहे.

दरम्यान, अटलजींच्या अंत्यदर्शनासाठी जवळपास 5 लाख लोक येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय नेतेही येणार असल्याने या परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)