अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी एकबोटे यांची मुंबई हायकोर्टात धाव

मुंबई – कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. पुणे सत्र न्यायालयाने २२ जानेवारीला एकबोटे यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. आता अटक टाळण्यासाठी एकबोटे यांनी  हायकोर्टात जामिनासाठी याचिका दाखल केली असून ३१ जानेवारीला सुनावणी होणार आहे.

एकबोटे यांच्यावरील आरोप गंभीर असून त्यांना जामीन मंजूर करता येणार नाही असं पुणे सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळताना म्हटलं होतं. तर ज्या वेळी दंगल घडली त्यावेळेस एकबोटे घटनास्थळी नसल्याचा युक्तीवाद एकबोटेंच्या वकीलांनी केला होता.

-Ads-

कोरेगाव भीमा इथं जी दंगल झाली त्यामागे मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांचा हात असल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात अनिता साळवे यांनी पिंपरीत एफआयआर दाखल केला होता तर आणखी एक गुन्हा औरंगाबादेत नोंदवण्यात आला होता. हे दोन्ही गुन्हे शिक्रापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)