अज्ञात वाहनाच्या धडकेने वृद्धाचा मृत्यू

पिंपरी – 16 ऑक्‍टोबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास पुणे-नाशिक रस्त्याने दुचाकीवरून (एमएच 14 एवाय 3626) मोशीकडे जाताना राजमाता जिजाऊ उड्डाण पुलावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पुलावरून खाली रस्त्यावर पडल्याने गंभीर दुखापत झालेले प्रकाश गणपत चिपाडे (वय 55, रा. मोशी प्राधिकरण) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पंकज प्रकाश चिपाडे (वय 26, रा. मोशी प्राधिकरण) यांच्या फिर्यादीवरून भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांना अज्ञान वाहनाने मागील बाजूने धडक दिली. अपघातात त्यांना दोन्ही पाय, हात, पाठीला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अज्ञात वाहन चालक घटनेची माहिती न देता घटनास्थळावरून निघून गेला, अशी माहिती पोलिसांनी दिली. भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. वाय. पाटील तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)