अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार

file photo

अपघातानंतर वाहन चालक फरार

फलटण, दि. 4 (प्रतिनिधी) – फलटण ते पंढरपुर रस्त्यावर विडणी गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तीस वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर वाहन चालक फरार झाला आहे.

याबाबतची माहिती अशी की, पंढरपूर येथे कामासाठी आलेले एकनाथ पांडुरंग मोरे व त्यांच्या पत्नी तसेच चुलत भाऊ काल रात्री पंढरपूरहुन मूळ गावी कोतुरने शिवली, ता. मावळ, जि. पुणे येथे इको मारुती गाडी नंबर 14 इयु 9163 मधुन निघाले होते. फलटण बाजुकड़े येत असताना विडणी तालुका फलटण गावच्या हद्दीत रात्री साडे अकराच्या सुमारास ते एका धाब्यावर जेवणासाठी थांबले होते. एकनाथ मोरे यांचे चुलत भाऊ दत्ता शंकर जाधव (राहणार शिवली, तालुका मावळ, जिल्हा पुणे) हे बाथरूमला जातो असे सांगून रस्ता क्रॉस करीत असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने ते जागीच ठार झाले. अपघातानंतर वाहन चालक तेथे न थांबता पळून गेला. संबंधित वाहन पांढऱ्या रंगाचे होते. रस्त्यावर वाहनाचे फायबरचे पांढऱ्या रंगाचे तुकडे पडलेले होते. या घटनेची फिर्याद एकनाथ पांडुरंग मोरे (वय 20) रा. शिवली, तालुका मावळ, जिल्हा पुणे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास सहायक फौजदार भोईटे हे करीत आहेत.

दि. 4 रोजी पहाटे 2 ते 3 या वेळेत फलटण येथील स्मशानभूमीच्या वळणावर एका गुटखा घेऊन जाणाऱ्या स्विफ्ट व प्रवासी ट्रॅव्हल्स गाडीचा अपघात झाला. यावेळी पुण्यातील एका प्रसिद्ध गुटखा व्यापाऱ्यांचा स्विफ्ट गाडीत मोठ्या प्रमाणात गुटखा होता. यावेळी दोन पोलीस कर्मचारी यांना अपघाताची माहिती मिळताच तिथे आले. विडणी येथे झालेल्या अपघातातील घटनास्थळावरून पळून गेलेली गाडी असल्याचा संशय त्यांना आला. परंतु ती गाडी ही नव्हती ही खात्री झाल्यानंतर लाखो रुपयांची तडजोड करत त्यातील काही रक्कम ट्रॅव्हल्सवाल्यास देऊन संबंधित प्रकरण दडपण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)