ओतूर – डिंगोरे (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत हॉटेल जीवनदीप समोर मंगळवारी (दि. 4) पहाटे 3 च्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याची मादी ठार झाली. तिचे वय अंदाजे 3 ते 5 वर्ष आहे.
मृत बिबट्याच्या मादीचा पंचनामा करून डिंगोरेचे पशु वैद्यकिय अधिकारी डॉ. धिदांके व डॉ. साळुंके यांनी शवविच्छेदन केले. यावेळी ओतूर वनविभागाचे वनक्षेत्र अधिकारी बी. सी. येळे, वनपरिमंडळ अधिकारी व्ही. आर. अडागळे, उदापूरचे नियत क्षेत्र अधिकारी एस. ए. राठोड, वनमजूर फुलचंद खंडागळे, वसंत जाधव, गंगाराम जाधव उपस्थित होते. यानंतर उदापूर येथील शासकीय रोपवाटिकेत तिच्यावर अंत्यविधी करण्यात आला. दरम्यान डिंगोरे, उदापूर व बनकर फाटा परिसरात अनेक शेळ्यांचा बिबट्याने फडशा पाडला होता. तसेच अनेक दुचाकीस्वरांचा पाठलाग करून वाहन चालकांना जखमी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)