अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

file photo

मंचर- अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेले नवनाथ सखाराम भुतांबरे (रा. कन्हेर पोखरी, गुऱ्हेवाडी, ता. पारनेर) यांचे निधन झाले. गुरुवारी (दि. 29) रात्री सव्वा अकरा वाजता अपघात झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवनाथ भुतांबरे हे डिस्कव्हर गाडीवरून भोरवाडी येथून नाशिककडे जात होते. त्यामुळे अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात भुतावरे यांच्या डोक्‍यास गंभीर दुखापत झाली होती. उपचारासाठी त्यांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात भर्ती केले होते; परंतु त्यापूर्वीच भुतांबरे यांचे निधन झाले. मंचर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)