अज्ञात वाहनाच्या धक्‍क्‍याने एकाचा मृत्यू

लोणी काळभोर- पुणे सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत हॉटेलमध्ये काम करणारा कामगार लोणी काळभोर रेल्वे स्टेशनवर उतरून घरी जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात मोहन गिरी गोस्वामी (वय 43, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली, मूळ गाव परिवां, ता. पाटी, जि. चंपावत, उत्तराखंड राज्य) हे या अपघातात मरण पावले. या संदर्भात त्यांचे पुतणे जगतगिरी पानगिरी गोस्वामी (वय 27, रा. येवलेवाडी, कोंढवा, पुणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे. मोहन गिरी गोस्वामी हे कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एका हॉटेलमध्ये नोकरी करत होते.
सोमवारी (दि.26) त्यांना सुटी असल्याने ते पुण्यात खरेदी करण्यासाठी गेले होते. रात्री अकरा वाजता ते काळभोर रेल्वे स्टेशनवरून पुणे सोलापूर महामार्गाने पायी घरी निघाले होते. हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीसमोर अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात मोहन गिरी गोस्वामी यांच्या डोक्‍याला, हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली होती. नागरिकांनी त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; परंतु त्या पूर्वीच ते मयत झाले होते. पुढील तपास पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन थोरबोले करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)