पळशी –  वार्ताहर

माण तालुक्‍यातील वरकुटे – मलवडी परिसरातील जनावारांने अज्ञात रोगाने मृत्यूमुखी पडल्याने मेंढपाळांचे सुमारे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या जनावरांच्या रोगाचे निदान पशुवैद्यकीय विभागाला झाले नसल्याने शेळ्या – मेढ्यांच्या मुत्यूचे सत्र सुरूच आहे.
वरकुटे – मलवडी परिसरातील वाघमोडे वस्ती , मिसाळ वस्ती येथील शेतकर्यांच्या शेळ्या – मेंढ्या डोळ्या देखत दगावल्याने मेंढपाळांना अश्रू आवरता आले नाहीत. यामध्ये महादेव आण्णा वाघमोडे यांच्या मेंढ्या व रेडकू , सदाशिव आण्णा वाघमोडे यांच्या मेढ्या , पोपट दर्याबा मिसाळ यांच्या शेळ्या , मारुती जयाप्पा मिसाळ यांची शेळी व रेडकू , लक्ष्मी दादा वाघमोडे यांच्या शेळ्या , कैलास नाना मिसाळ यांच्या शेळ्या व करडे , भाऊ लक्ष्मण मिसाळ यांच्या मेंढ्या , तातोबा पांडुरंग मिसाळ शेळ्या , नामदेव साधू मंडले यांची शेळी , लहु गोविंद वनवे यांची म्हैस व जर्सी गाय अशी शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत. त्यामूळे त्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. या घटनेचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
त्याच बरोबर या रोगाचे निदान करून लसीकरण व तपासणी मोहीम राबवावी अशी ही मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)