‘अजेय भारत; अटल भारत’ मोदींची घोषणा

नवी दिल्ली – 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “अजेय भारत, अटल भारत’ ही नवीन घोषणा दिली आहे. पक्षाच्या मूलभूत तत्वांना आणि देशाच्या प्रगतीवर प्रकाश टाकण्यासाठी ही नवीन घोषणा पंतप्रधानांनी दिली आहे. या घोषणेद्वारे पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे.

भारत कायमच विजेता राहिल आणि कोणाच्याही आधीन राहणार नाही. या तत्वाला भाजपची कटिबद्धता कायम असेल, असेच या घोषणेतून सूचित करण्यात येत आहे, असे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. भाजपविरोधात विरोधकांच्या महाआघाडीवरही टीका करताना “जे डोळ्यास डोळे मिळवू शकत नाहीत, तेच आता महाआघाडी करण्याचा विचार करत आहेत.’ असे मोदी म्हणाले. आपल्याला समृद्ध भारत हवा आहे. मात्र त्याचे मूलभूत तत्व साधेपणा हेच असेल, असेही पंतप्रधान म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)