अजित पवार शनिवारी शहरात

पिंपरी – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने काढण्यात आलेली निर्धार परिवर्तन यात्रा शनिवारी (दि. 2) पिंपरी-चिंचवड शहरात येत आहे. या यात्रेच्या निमित्ताने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे या सभेत मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी बुधवारी (दि. 30) पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक नाना काटे, भाऊसाहेब भोईर, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, युवक कार्याध्यक्ष योगेश गवळी, वर्षा जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्य व केंद्र सरकारचा भ्रष्टाचार, “स्मार्ट सिटी’च्या नावाने शहरात वाढलेला बकालपणा, फसलेली जीएसटी, नोटाबंदी मंत्रिमंडळातील घोटाळे, दुष्काळ हाताळण्यात आलेले अपयश असे अनेक प्रश्‍न घेऊन राष्ट्रवादीच्या वतीने 10 जानेवारीपासून रायगड येथून निर्धार परिवर्तन यात्रा सुरू झाली आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांचा दौरा करून शनिवारी ही यात्रा पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहे. शनिवारी (दि. 2) सायंकाळी साडे पाच वाजता सांगवीतील पी. डब्ल्यु. डी. मैदानावर सभा आयोजित करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे हे सर्व दिग्गज मार्गदर्शन करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)