पिंपरी – राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहराची आढावा बैठक येत्या दि.30 मे रोजी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे. बुधवार (दि.30) रोजी विधान सभा निहाय कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात येणार असून सकाळी साडे नऊ वाजता कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी येथे दुपारी अडीच वाजता केरला भवन, प्राधिकरण येथे तर सायंकाळी 05.30 वाजता कै. निळू फुले नाट्यगृह, पिंपळे गुरव येथे आढावा बैठक होणार आहेत.

10 जून रोजी पक्षाचा वर्धापन दिन तसेच पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलन सांगता सभेच्या पूर्व नियोजना संदर्भात बैठकीत चर्चा होईल. आढावा बैठक शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शहरातील माजी आमदार, तसेच आजी-माजी नगरसेवक, व पक्षाचे सर्व सेलचे अध्यक्ष पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे, अशी माहीती पक्ष प्रवक्ते फजल शेख यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)