अजित पवार घेणार बैठक

 

पिंपरी – राष्ट्रवादीचे माजी आमदार, महापौर, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक सोमवारी (दि. 1) आयोजित करण्यात आली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दिली.
आकुर्डीतील हॉटेल ग्रॅण्ड एक्‍झॉटिका येथे दुपारी दुपारी चार वाजता पवार बैठक घेणार आहेत. या बैठकीला शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर यांच्यासह सर्व आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. त्यादृष्टीने नगरसेवकांची मते जाणून घेतली जाणार आहेत. पक्ष संघटनेबाबत पदाधिकाऱ्यांना पवार मार्गदर्शन करणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)