अजित डोवाल यांची चीनच्या विदेश मंत्र्यांशी चर्चा 

बिजींग: भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची आज चीनचे विदेश मंत्री वांग यांच्याशी चीन मध्ये चर्चा झाली. या चर्चेत प्रामुख्याने दोन्ही देशांमधील सीमा प्रश्‍नांचा समावेश होता. दोन्ही देशांमध्ये या विषयावर झालेली चर्चेची 21 वी फेरी होती.

चीन मधील दुजियांग्यान शहरात ही चर्चा झाली. डोवाल आणि वांग यांना भारत आणि चीनने सीमा प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी आपआपल्या देशांनी नियुक्त केले आहे. त्यांच्यातील चर्चेची ही फेरी आज संपत आहे. ही चर्चा समाधानकारक झाल्याचे चीनच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने म्हटले आहे. त्यांनी नमूद केले आहे की चर्चेच्या माध्यमातून सीमा प्रश्‍नावर सोडवणूक करून त्या भागात शांतता कायम ठेवण्याच्या आमच्या प्रयत्नांना बऱ्यापैकी यश येत आहे.

भारत आणि चीन यांच्या प्रत्यक्ष ताब्यात असलेल्या भागातील 3488 किमीच्या सीमा भागाविषयी विवाद आहे. अरूणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग आहे त्यामुळे त्या राज्यावर आमचा हक्क आहे असा दावा चीनने केला आहे. भारत आणि चीन यांच्यातील सीमा प्रश्‍नाची या आधीची चर्चा नवी दिल्लीत झाली होती. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये डोकलाम विषयावरून तणाव निर्माण झाला होता. दोन्ही बाजूंमध्ये या विषयी आत्तापर्यंत चर्चेच्या 20 फेऱ्या झाल्या असल्या तरी सीमा प्रश्‍नावर कोणताही ठोस उपाय त्यावर अजून निघालेला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)