अजित डोवाल ‘मोस्ट पॉवरफुल’

नवी दिल्ली – भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर केंद्र सरकारने नवी जबाबदारी सोपवली आहे. ते आता स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुपचे (एसपीजी) अध्यक्ष असतील. या नव्या जबाबदारीमुळे ते गेल्या वीस वर्षांतील सर्वात ताकदवान सरकारी अधिकारी बनले आहेत. विदेशी, देशांतर्गत आणि आर्थिक सुरक्षा प्रकरणांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या (एनएससी) मदतीसाठी 1999 मध्ये एसपीजीची स्थापना करण्यात आली होती.

अजित डोवाल यांच्यावर नवी जबाबदारी टाकल्याने ते आता एसपीजीच्या बैठकांचे संयोजन करतील. त्याचबरोबर कॅबिनेट सचिवांनी घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणी संदर्भात विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये समन्वय राखण्याचे काम करतील.

-Ads-

यापूर्वी कॅबिनेट सचिवांकडेच एसपीजीचे अध्यक्षपद असायचे. सरकारमधील हे सर्वात वरिष्ठ सरकारी अधिकारी असतात. मात्र, आता एसपीजीच्या अध्यक्षपदी देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल असतील. या संदर्भात मोदी सरकारने 11 सप्टेंबर रोजी अधिसुचना प्रसिद्ध केली होती. या अधिसुचनेनुसार, आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना या समुहाचे अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे.

दरम्यान, यापूर्वी एसपीजीमध्ये 16 सदस्य होते. ज्यांची संख्या वाढवून आता 18 करण्यात आली आहे. यामध्ये कॅबिनेट सचिव आणि नीति आयोगाचे उपाध्यक्ष यांना दोन नव्या सदस्यांच्या रुपात समाविष्ट करण्यात आले आहे. एसपीजीच्या इतर सदस्यांमध्ये तीनही सैन्यदलांचे प्रमुख, रिझर्व्ह बॅंकेचे प्रमुख, गृह सचिव, वित्त सचिव, संरक्षण सचिव, परराष्ट्र सचिव आणि इंटेलिजन्स ब्युरोच्या प्रमुखांचा समावेश आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)