वॉशिंग्टन – भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार अजित डोवाल हे अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाशी वरीष्ठ पातळीवरून चर्चा करण्यासाठी अमेरिकेत दाखल झाले आहेत. अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पॉम्पेओ यांच्याशी द्विपक्षीय बाबींवर चर्चा करणार आहेत. अमेरिकेच्या संरक्षण खात्यातील वरीष्ठांबरोबर त्यांच्या थिंक टॅंकशीही चर्चा करणार असून अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्याशीही ते स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत.

तथापी ते त्यांच्याशी कोणत्या विषयांवर चर्चा करणार आहेत या विषयी मात्र दोन्ही देशांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अमेरिका आणि भारत यांच्यात गेल्याच आठवठ्यात दोन अधिक दोन पातळीवर चर्चा झाली होती त्यानंतर लगेच डोवाल अमेरिकेत दाखल झाल्याने त्याला विशेष महत्व दिले जात आहे. डोवाल यांच्या कार्यक्रम पत्रिकेविषयी पत्रकारांनी आज अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्‍त्या हिदर नौआर्ट यांना विचारले असता त्यांनीही त्यावर फारसे काही भाष्य केले नाही. अमेरिका आणि भारत हे आता अधिक जवळचे मित्र आहेत एवढेच ते या अनुषंगाने म्हणाल्या.

आम्हाला दोन्ही देशांतील लोकांमधील थेट संवाद वाढवायचा आहे. आज जवळपास तीन लाख भारतीय नागरीक अमेरिकेत राहात आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये अशा पातळीवर वेळोवेळी चर्चा होतच राहतील असे त्या म्हणाल्या. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतात भेट देण्याची शक्‍यता आहे त्या पार्श्‍वभूमीवरही डोवाल यांच्या भेटीला महत्व आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)