अजित काटकर यांना “स्वदेशी भारत सन्मान’

म्हसवड – वरकुटे येथील ग्रामीण साहित्यिक, चित्रपट कथा व पटकथा लेखक अजित काटकर यांचा नुकताच त्यांच्या ” वंशाचा दिवा “या कथासंग्रहाबद्दल स्वदेशी भारत सन्मान पुरस्काराने कवि चांदगुडे व पत्रकार अरविंद मेहता यांच्या हस्ते गोरवण्यात आले आहे.

अजित काटकर यांनी आपल्या खास ग्रामीण शेलीतून लिखाण करून ग्रामीण साहित्यात आपला ठसा उमटवला आहे. त्यांना लिखाणासाठी साहित्य क्षेत्रातील मानाचा ‘कथासागर आचार्य अत्रे पुरस्कार, माणदेशी लेखक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच विनोदी कथांना राज्यपातळीवरील गुंफणचे कथापुरस्कार मिळाले आहेत. त्यांची कथा असलेला ‘अखेरचा श्‍वास’ लघुचित्रपट आंतरराष्टीय लघुचित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला. त्यांनी आजपर्यंत पाच कथासंग्रह दोन कादंबऱ्या व दोन ललित लेखांच्या पुस्तकांचे लेखन केले आहे. तसेच तीन चित्रपटांचे कथालेखनही त्यांनी केले आहे.

अजित काटकर यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे माण पंचायत समितीचे सभापती श्रीराम पाटील, नगराध्यक्ष नितिनभाई दोशी, फ. ए. सो. च्या गव्हर्निंग कोन्सिलचे सदस्य ऍड. पृथ्विराज राजेमाने,चेअरमन बाळासाहेब माने, उपविभागीय पोलिस अधिकरी अंकुश इंगळे, क्रांतिवीर शेक्षणीक संकुलाचे अध्यक्ष प्रा. विश्‍वंभर बाबर, प्राचार्य अर्जुन रुपनवर, अरुण काकडे, विठ्ठल हंकारे, भुजबळ, मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव, सुधीरअहिवळे, अशोक शिंदे, लेखक बबन पोतदार, गुंफण अकादमीचे बसवेश्‍वर चेणगे, स्वदेशी भारतचे प्रकाश सकुंडे, ग्रामविकास अधिकारी विजय काटकर, विजय शिंदे पत्रकार संघाचे सर्व सदस्य यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)