अजितदादा, शिंदेंच्या उपस्थितीत उद्या शेतकरी मेळावा

अकोल्यातील पिंपळगाव खांड धरणाचे जलपूजन व लोकार्पण सोहळा
अकोले – अकोले येथील पंकज लॉन्स येथे शनिवारी दुपारी 12 वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व माजी जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे हे या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव व सचिव यशवंत आभाळे यांनी पत्रकारांना दिली.
त्याअगोदर सकाळी दहा वाजता पळसुंदे (ता. अकोले) येथील जलाशयाचे पूजन आणि लोकार्पण सोहळा पवार व शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी 3 वाजता पिंपळगाव खांड धरणाचे जलपूजन आणि लोकार्पण सोहळा या दोन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या सर्व कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकरराव पिचड हे राहतील, असे ही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आ. वैभवराव पिचड, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वाकचौरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपील पवार, पक्षाचे माजी कार्याध्यक्ष दिलीप शिंदे, आबासाहेब थोरात, संतोष शेळके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यास अकोले व संगमनेर या तालुक्‍यातील जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे, मधुकरराव नवले, पर्बतराव नाईकवाडी, रामनाथ बापू वाकचौरे, रमेशराव देशमूख, नगराध्यक्ष संगीता शेटे, शंभू नेहे, चंद्रकला धुमाळ आदी सदस्यांनी केले आहे.
राज्यात आमदार राम कदम यांच्यासह भाजपच्या नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये, बाजार समित्यांचा बंद आणि शेतमालाला भाव नसल्यामुळे अडचणीत आलेले शेतकरी या पार्श्‍वभूमीवर अजितदादा व शशिकांत शिंदे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दोन भगिरथांच्या उपस्थिती लोकार्पण

पिंपळगाव खांड धरणाला नियमांच्या चौकटीत बसवून माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे मुळा बारमाही होण्याचे स्वप्न अजितदादांमुळे साकारले. पळसुंदे धरण न्यायालयीन प्रक्रियेत अडकले असताना त्याला सनदशीर मार्गाने परवानगी देण्याचे काम शशिकांत शिंदे यांनी केले आहे. त्यांच्याच उपस्थितीत या धरणांचे लोकार्पण होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)