अजिंठा व वेरूळचा प्रतिष्ठित पर्यटनस्थळांच्या यादीत समावेश

नवी दिल्ली केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या प्रतिष्ठित पर्यटनस्थळ प्रकल्पात देशातील १२ पर्यटन स्थळांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध अजिंठा व वेरूळ लेण्यांचा यादीत समावेश आहे.

केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री के.जे.अल्फॉन्स यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. देशातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने‘प्रतिष्ठित पर्यटन स्थळ प्रकल्प’ हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत देशभरातील महत्त्वाच्या १२ पर्यटनस्थळांची निवड करण्यात आली आहे.

यादीत उत्तर प्रदेशातील ताजमहल आणि फत्तेपूर सिक्री, महाराष्ट्रातील अंजिठा व वेरूळ लेण्या, दिल्लीतील हुमायू मकबरा, कुतुबमिनार आणि लाल किल्ला, गोव्यातील कोळवा समुद्र किनारा, राजस्थानातील आमेर किल्ला, गुजरातमधील सोमनाथ मंदिर आणि ढोलाविरा, मध्यप्रदेशातील खजुराहो, कर्नाटकातील हंपी, तामिळनाडूतील महाबलीपूरम, आसाममधील काझीरंगा अभयारण्य, केरळमधील कुमारकोम आणि बिहारमधील महाबोधी विहाराचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती अल्फॉन्स यांनी दिली.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)