अजिंक्‍यतारा सूत गिरणीच्या प्रगतीचा आलेख चढताच राहिल : वेदांतिकाराजे

सातारा- शासनाच्या प्रतिकूल धोरणांमुळे सहकारी संस्थांपुढे अडचणी निर्माण होत आहेत. अनंत अडचणींवर मात करुन अजिंक्‍यतारा सहकारी सूत गिरणीचे कामकाज जोमाने सुरु आहे. आज या सूत गिरणीमध्ये विविध प्रकारच्या उच्चतम सुताचे उत्पादन घेतले जाते आणि या सूताला देशासह परदेशी बाजारपेठेतही चांगली मागणी आहे. सूत गिरणीने अल्पावधीत नावलौकिक कमावला असून अजिंक्‍यतारा सूत गिरणीच्या प्रगतीचा आलेख सदैव चढताच राहिल, असे प्रतिपादन सूत गिरणीच्या मार्गदर्शक श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.

वळसे ता. सातारा येथील अजिंक्‍यतारा सहकारी सूत गिरणीची 28 वी वार्षिक साधारण सभा गिरणी कार्यस्थळावर मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. याप्रसंगी सौ. वेदांतिकाराजे बोलत होत्या. सभेच्या अध्यक्षस्थानी गिरणीचे चेअरमन रामचंद्र बाळकृष्ण जगताप होते.

 

यावेळी बोलताना सौ. वेदांतिकाराजे म्हणाल्या की, सध्याच्या परिस्थितीत शासनाची धोरणे पाहता व सहकारी संस्था नफ्यामध्ये येणेसाठी सर्व सहकारी संस्थानी व्यावसाईक तसेच कार्पोरेट कंपनी प्रमाणे धोरण ठरवून कामकाज केले पाहिजे. तरच नफ्याच्या प्रमाणात वाढ होवून सहकारी संस्था सुरळीत चालतील व त्याचा सर्व सभासदांना फायदा होईल.

 

यासाठी अजिंक्‍यतारा सूत गिरणीने बाजारपेठेच्या मागणी प्रमाणे विविध प्रकारचे सूत निर्मिती करण्यांसाठी अत्याधुनिक तसेच तांत्रिक दृष्ट्या सक्षम अशा परदेशी मशिनरी खरेदी करून गिरणीमध्ये कार्डेड, कॉम्पॅक्‍ट,कोम्बड, व स्लब आदी सूताची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे सूतास चांगल्या प्रकारे भारतीय तसेच परदेशी बाजारपेठा मिळत आहे ही बाबत कौतुकास्पद आहे. सूत गिरणीने ठरविलेल्या धोरणानुसार कामकाज व्यवस्थीत चालले असून त्यामध्ये प्रगतीचा आलेख उंचावत चालला आहे. सूत गिरणीने 14400 चात्यांचा पहिला टप्पा पूर्ण केला असून उर्वरीत दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी सूत गिरणी नियोजनपूर्वक पावले उचलत आहे. यासाठी सर्व संचालक मंडळ तसेच अधिकारी, कर्मचारी यांचे कार्य कौतुकास्पद आहे.

सभेच्या प्रारंभी स्व.श्रीमंत छ.अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराजसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर गिरणीचे संचालक उत्तमराव नावडकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. गिरणीचे कार्मकारी संचालक संजय कुलकर्णी यांनी श्रध्दांजली ठराव वाचन केले आणि चीफ अकौंटंट मानसिंग पवार यांनी नोटीस वाचन करून अजेंड्यावरील सर्व विषय मंजूरीसाठी सादर केले, त्यास सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजूरी दिली. संचालक जगन्नाथ किर्दत यांनी आभार मानले.

याप्रसंगी गिरणीचे सर्व संचालक, अजिंक्‍यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, अजिंक्‍य बझारचे संचालक प्रकाश नाईक, अजिंक्‍यातारा सहकारी कृषि औंद्योगिक ऊस तोडणी व वाहतूक संस्थेचे चेअरमन बाळकृष्ण फडतरे, सातारा जिल्हा खरेदी विक्री संघाचे व्हा. चेअरमन ऍड. सुर्यकांत धनवडे, अजिंक्‍यातारा सहकारी सूत गिरणीचे माजी संचालक भानुदास मोहिते, किशोर घाडगे, अजिंक्‍यातारा साखर कारखान्याचे संचालक अनंता वाघमारे, नितीन पाटील, माजी व्हा. चेअरमन दिलीप निंबाळकर यांच्यासह गिरणीचे सर्व सभासद, प्रॉडक्‍शन मॅनेजर शैलेश जानकर, मिल इंजिनीयर प्रदीप राणे, एच आर मॅनेजर राजेश दिक्षीत, कर्मचारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)