अजिंक्‍यतारा रस्त्यांच्या कामास निधी मंजूर

लवकरच काम होईल सुरू

सातारा – गोडोली येथील साईबाबा मंदिर ते किल्ले अजिंक्‍यतारा मुख्य दारवाज्या पर्यंतच्या रस्त्याच्या कामकाजास निधी मंजूर झाला आहे. लवकरच त्याचे कामकाज सुरू होईल. गोडोली ते अजिंक्‍यतारा मुख्य दरवाज्या पर्यंतचा रस्ता सातारा नगरपरिषदेच्या हद्दीतला असून कामाठीपुरा कॉर्नर ते किल्ला मार्ग हा रस्ता जिल्हा परिषद सातारा यांच्या अखत्यारीत आहे. गेल्या 10 ते 15 वर्षात डागडुजी न झाल्याने रस्त्याची दुरावस्था झाली होती. किल्यावर फिरायला जाणाऱ्या नागरिकांसह पर्यटकांना या रस्त्यातून प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. मध्यंतरी पर्यटनासाठी आलेली विद्यार्थ्यांची बस ही शंकराचार्य मठाच्या बाजूला किल्यावरून घसरली होती. त्यावेळी कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र भविष्यात असे घडू नये यासाठी रस्त्याची दुरुस्ती या रस्त्याच्या निधीसंदर्भत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अनेक वेळा चर्चा झाली होती.

पालक मंत्री विजय शिवतारे यांच्याकडे सर्वच आमदार, खासदार, तसेच शिवप्रेमी दुर्गप्रेमी सामाजिक कार्यकर्ते संघटनांच्या प्रतिनिधींनी पाठपुरावा केल्याने प्रादेशिक पर्यटन व किल्ले संवर्धन निधी मंजूर झाला. या कामच्या एक कोटी 21 लाख 111 रुपयांचे कामाला मंजुरी देण्यात आली आहे. रस्ता कामाच्या सूचनाही सबंधितांना देण्यात आली असून किल्ला मार्गाचे काम व संरक्षक कठडे याचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे अशी मागणी विश्व हिन्दु परिषद जितेंद्र वाडकर यांनी केली आहे.

जितेंद्र वाडकर
“” किल्ल्यावरील नव्याने मार्च ते एप्रिल महिन्यात विद्युत दिवे व खांब बसविले आहेत. ते बंद अवस्थेत आहेत. यासाठी वापरलेला पैसा वाया जात असून, कार्यकारी अभियंता महावितरण यांचे याबाबीकडे दुर्लक्ष झाले आहे. या वीज बिलाचे पैसे जिल्हा परिषदेने भरण्याची तरतूद दिवे लागत नसल्याने किल्यावर फिरायला जाणारे नागरिकांना याचा त्रास होत आहे. बसविलेल्या खांबाना दिलेला रंग देखील उडाला आहे. उभारण्यात आलेले खांबाची देखभाल दुरूस्ती ही करावी.”


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)