रक्षाबंधन: वाचा अजिंक्य रहाणे का ‘मिस’ करतोय रक्षाबंधन…

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने ट्विटर द्वारे आपल्याला रक्षाबंधन सणाची आठवण येत असल्याचे सांगितले आहे. सध्या भारतीय संघाबरोबर अजिंक्य रहाणे इंग्लंड दौऱ्यावर असल्याने त्याला यावर्षी आपल्या मनगटावर बहिणीकडून राखी बांधून घेता आली नसल्याची खंत त्याने ट्विटरद्वारे बोलून दाखवली आहे.

आपल्या ट्विट मध्ये अजिंक्य रहाणे याने त्याची बहीण अपूर्वा हिच्या सोबतचा आपला रक्षाबंधनाचा एक जुना फोटो शेअर करत ‘यावर्षी मी तुझ्या हातून माझ्या मनगटावर बांधण्यात येणाऱ्या राखीला खूप ‘मिस’ करत असून तू जगातील सर्वात चांगली बहीण आहेस, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा अपूर्वा’ असा भावुक संदेश त्याने लिहिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/ajinkyarahane88/status/1033615858315218945

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)