अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : केपटाऊन कसोटीतल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राजस्थान रॉयल्सने ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथऐवजी अजिंक्य रहाणेची आपल्या आयपीएल संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टला केपटाऊन कसोटीत चेंडू अवैधरित्या हाताळताना टेलिव्हिजन कॅमेऱ्यानं रंगेहाथ पकडले आहे. या अखिलाडू कृतीस एकटा बॅनक्रॉफ्ट दोषी नसून, त्या कृतीमागे ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्त्वगटाचा निर्णय असल्याची कबुली ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने दिली होती. त्यानंतर आयसीसीने स्मिथवर एका कसोटी सामन्याची बंदी आणि मानधनाच्या शंभर टक्के रकमेचा दंड अशी कारवाई केली होती.

आता राजस्थान रॉयल्सनंही स्मिथची कर्णधारपदावरुन हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला केपटाऊन कसोटीत चेंडू अवैधरित्या हाताळताना टेलिव्हिजन कॅमेराने रंगेहाथ पकडले. या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बॅनक्रॉफ्टने खिशातून सँडपेपर काढून, आधी चेंडू त्या सँडपेपरने घासला आणि मग तो सँडपेपरचा तुकडा पुन्हा आपल्या पँटच्या आत दडवला. हे पूर्ण दृश्य टेलिव्हिजन कॅमेराने टिपलं.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)