अजय म्हाळसकरने मारले 2020 जोर

वडगाव-मावळ – मोरया स्पोर्ट फाउंडेशनच्या जोर मारणे स्पर्धेत खुल्या गटात अजय बाळासाहेब म्हाळसकर याने 2020 जोर मारुन व लहान गटात आयुष्य अतुल जाधव याने 1801 जोर मारुन प्रथम क्रमांक मिळवला. स्पर्धेचे उद्‌घाटन माजी राज्यमंत्री मदन बाफना यांनी केले.

माजी राज्यमंत्री मदन बाफना यांच्या वाढदिवसानिमित्त वरद मोटर्स जवळ मैदानात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गणेश ढोरे, अशोक बाफना, मंगेश ढोरे, पंढरीनाथ ढोरे, गंगाधर ढोरे, हनुमंत म्हाळसकर, कबड्डी संघाचे तालुकाध्यक्ष रमेश पाळेकर, राजेंद्र देशमुख व मान्यवर उपस्थित होते. यावेळी नामवंत खेळाडू राजेंद्र वहिले, अर्जुन ढोरे, विनायक लोकरे, नितीन म्हाळसकर, चिराग वाघवले, मनोज म्हाळसकर, शुभम तोडकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी राज्यमंत्री मदन बाफना, श्री पोटोबा देवस्थान मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, भंडारा डोंगर दशमी समिती अध्यक्ष बाळासाहेब काशीद, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गणेश ढोरे आदींचे भाषण झाले.

कबड्डी स्पर्धेत वडगाव येथील संजय वाघवले कबड्डी संघाने प्रथम क्रमांक, मयूरदादा ढोरे कबड्डी संघाने द्वितीय क्रमांक, सुसगाव येथील कालभैरव कबड्डी संघाने तृतीय क्रमांक व वलवण येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने चतुर्थ क्रमांक पटकावला. विजेत्या संघांना 11 हजार 111 रुपये, 9 हजार 999 रुपये, 7 हजार 777 रुपये व 5 हजार 555 रुपये रोख बक्षिस व सन्मान चिन्ह देण्यात आले. यावेळी स्पर्धा पाहण्यासाठी गर्दी झाली होती. जोर मारणे स्पर्धेत म्हाळसकर याला रोख 13 हजार रुपये, तर जाधव याला रोख 7 हजार रुपये मिळाले.

उत्कृष्ट व वेगवान जोर मारण्याचे पारितोषिक अजय म्हाळसकर यांना देण्यात आले. जोर मारण्याच्या स्पर्धेत लहान गट विवेक पाटील – 1750, जीवन येवले – 1750, प्रणव म्हाळसकर – 1375, समर्थ भेगडे – 900, स्वराज लष्करी – 750, विनीत वहिले – 503, पृथ्वीराज चव्हाण – 501, करण म्हाळसकर -166 यांनी भाग घेतला. मोठ्या गटात ऋत्विक खांडेकर -1571, आदिनाथ तारू -1208, प्रतीक कांबळे -750, किरण चव्हाण -650, मनोज जाधव -501, समीर वहिले -354 यांनी जोर मारले.

खुला गट स्वप्नील पट्टेबहाद्दूर -1610, धनंजय देवकर -1600, दिपराज गायकवाड -1050, सुनील नखाते -192, सुनील कोद्रे -81, संजय दंडेल -63, बाळकृष्ण ढोरे -61, अभिजित भिडे -50 यांनी भाग घेतला.
गणेश जाधव, सिद्धेश ढोरे, महेश ढोरे, विशाल शिंदे, महेंद्र ढोरे, अरुण कालेकर, यशवंत शिंदे, अंकुश ढोरे, बजरंग ढोरे, दिनेश ढोरे, शंकर साकोरे, संजय दंडेल, सुयोग बेल्हेकर यांनी स्पर्धेचे आयोजन केले. सिद्धेश ढोरे यांनी प्रास्ताविक केले. विशाल मोरे यांनी सूत्रसंचालन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)