अजय माकन यांचा राजीनामा

नवी दिल्ली: ज्येष्ठ कॉंग्रेस नेते अजय माकन यांनी दिल्ली प्रदेश कॉंग्रेस समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव आपण हे पद सोडत आहोत असे त्यांनी म्हटले आहे. दिल्लीतील पक्ष संघटनेच्या विषयाच्या संबंधात पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरूवारी रात्री बैठक घेतली त्यावेळी स्वता माकन आणि पक्षाचे दिल्ली शाखेची निरीक्षक तेथे उपस्थित होते. त्यावेळी राहुल गांधी यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला.

माकन यांची चार वर्षांपुर्वी या पदावर नियुक्ती झाली होती. या पदावर काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी पक्ष संघटनेचे कार्यकर्त्यांचे आणि पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचे आभार मानले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसला दिल्ली शहरात काही विशेष प्रभाव दाखवता आला नाही म्हणून त्यांच्या पक्षांतील विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची अनेक वेळा मागणी केली होती.वारी रात्री बैठक घेतली त्यावेळी स्वता माकन आणि पक्षाचे दिल्ली शाखेची निरीक्षक तेथे उपस्थित होते. त्यावेळी राहुल गांधी यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माकन यांची चार वर्षांपुर्वी या पदावर नियुक्ती झाली होती. या पदावर काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी पक्ष संघटनेचे कार्यकर्त्यांचे आणि पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचे आभार मानले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसला दिल्ली शहरात काही विशेष प्रभाव दाखवता आला नाही म्हणून त्यांच्या पक्षांतील विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची अनेक वेळा मागणी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)