अजय देवगनच्या ‘बादशाहो’चा टीझर प्रदर्शित

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक मिलन लुथरिया यांचा आगामी चित्रपट बादशाहोचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. देशातील आणीबाणीवर आधारित असलेल्या या चित्रपटात अभिनेता अजय देवगन, इम्रान हाश्‍मी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात अजय देवगन आणि इम्रान हाश्‍मी यांच्याशिवाय इलियाना डिक्रूज, ईशा गुप्ता आणि विद्युत जामवालही दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. ज्यामध्ये चित्रपटातील सर्व कलाकार दाखवण्यात आले होते. 1975 आणीबाणी, 96 तास, 600 किलोमीटर, असे या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये म्हटलेले आहे. हा ऍक्‍शन थ्रिलर चित्रपट 1 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)